शुक्रवार, 13 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024 (11:50 IST)

दाऊदला देखील पक्षातून उभे करणार, म्हणत नागपुरात नाना पटोले यांची भाजपवर टीका

nana patole
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षाने प्रचाराला सुरुवात केली असून एकमेकांवर शब्दांचे ताशेरे ओढ़त आहे. एकमेकांवर शब्दांचे बाण सोडत आहे. 

दरम्यान, दाऊद महाराष्ट्राच्या निवडणुकीत उतरल्याचे समोर आले आहे. या दरम्यान नागपुरात महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीच्या प्रचार सभेत भाजपला कोंडीत धरले आहे.   

ते म्हणाले, भाजपचे सत्ता जिहाद सुरु आहे. उद्या दाऊद देखील पक्षातून उभा राहिला तर हे लोक सत्तेसाठी त्यार होतील. नवाब मलिक यांचे संबंध दाऊदशी असून नवाब मलिक यांना टिकिट देण्यात आले आहे. येथे म्हणतात की बटेंगे तो कटेंगे. 
या पूर्वी नाना पटोले यांनी देवेंद्र फड़नवीसांवर वक्तव्य केले होते की , भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. भाजपला महाराष्ट्रातून हटवण्याची वेळ आली आहे. खोटे बोलून सत्तेवर आलेल्या या पक्षाला जागा दाखवण्याची वेळ आली आहे. ते पुढे म्हणाले की, भाजपवाले स्वतःला देव समजतात. त्यांना अद्दल घडवण्याची वेळ आली आहे. 
राहुल गाँधी संविधान आणि मुस्लिम आरक्षणावर बोलताना भाजप खोटेपणा असल्याचे सांगत आहे. असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit