शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (14:36 IST)

विरोधकांचे खोटे चालणार नाही, विधानसभा निवडणुकीवर फडणवीसांचे वक्तव्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुबंईत एका बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. त्यात त्यांनी राजकारण आणि महाराष्ट्राच्या व्हिजनवर चर्चा केली. विरोधकांवर बोलताना ते म्हणाले, सध्या राज्य सरकार तीन पक्ष मिळवून चालवत आहे. विरोधी पक्षाकडे अनुभवी नेते आहे ज्यांना राजकारणात 50 वर्षांचा अनुभव आहे. महायुतीचे सत्तेचे केंद्र कुठे आहे आणि कोणाला निशाणा बनवायचा आहे हे त्यांना चांगलेच माहित आहे. 

उद्धव ठाकरेंवर मी टीका केल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने माझ्यावर टीका केली. आम्ही लोकसभा निवडणुकी नंतर ज्या काही चुका केल्या होत्या त्या दुरुस्त केल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत विरोधकांना त्यांच्या खोट्या कथनांचा फायदा झाला.मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत असे काहीही होणार नाही. विरोधकांचे खोटे आता चालणार नाही. 

लोकसभेचे विश्लेषण केल्यावर 12 जागांवर वेगळा पेटर्न दिसतो. हा विधानसभेच्या निवडणुकीत दिसणार नाही. अजित दादांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत मते मिळणे  कठीण  होते मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत असे होणार नाही. असे ते म्हणाले. 
Edited by - Priya Dixit