रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (12:29 IST)

विधानसभा निवडणुकीत भाजपला 60 पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नसल्याचा रोहित पवारांचा दावा

rohit panwar
महाराष्ट्रात या वर्षी ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुकीबाबत राष्ट्रवादी- सपाचे नेते रोहित पवार यांनी भाजपच्या कामगिरीवर मोठे वक्तव्य केले आहे. 
ते म्हणाले, भाजपला यंदा राज्यात 60 पेक्षा अधिक जागा जिंकता येणार नाही. असा दावा त्यांनी केला आहे. ते निवडणुकाच्या तारखांबद्दल म्हणाले, जम्मू काश्मीरसह महाराष्ट्रात देखील निवडणुका होणार होत्या मात्र भाजपला भीती वाटते. 26 नोव्हेंबर पूर्वी निवडणूक होणार असली तर कदाचित निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते.तज्ज्ञांनी अशी शक्यता वर्तवली आहे. 

विधानसभा निवडणुकीबाबत रोहित पवार म्हणाले, भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, भाजपच्या पक्षाला 60 पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाही अशी चर्चा होत आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (एमव्हीए) विजयी होईल,असा दावा रोहित पवार यांनी केला. ते म्हणाले की या निवडणुकीत एमव्हीए सरकार स्थापन करेल आणि आम्ही 180 पेक्षा कमी जागा जिंकणार नाही. 
Edited by - Priya Dixit