संबंधित माहिती
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी MVA मध्ये खटपट! उद्धव ठाकरेंच्या या मागणीवर काँग्रेस आणि शरद पवार गप्प
- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: जागावाटपावर विचारमंथन, फडणवीस आणि बावनकुळे यांनी घेतली अमित शहा यांची भेट
- महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का! निवडणुकीपूर्वी 2 आमदार अजित पवारांच्या संपर्कात
- वन नेशन वन इलेक्शनवर संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला
- मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करा,मगच विधानसभा निवडणूकीचा प्रचार करा- उद्धव ठाकरे
समरजित घाटगे यांचा भाजपला राम राम, लवकरच करणार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश
Samarjeet Ghatge Facebook
घाटगे 3 सप्टेंबर रोजी कागलमधील गैबी चौक येथे शरद पवार, खासदार शाहू महाराज आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहे.
समरजित घाटगे यांच्या ट्विटर अकाऊंट वरून भाजपचं कमळ चिन्ह गायब झालं आहे. महायुतीच्या कोल्हापुरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी समारंभाला समरजित घाटगे यांची अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले.
समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीसांचे जवळचे मानले जातात. मात्र मुश्रीफ विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे घाटगे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता बळकट झाली. गेल्या काही दिवसांपासून समरजित घाटगे हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. घाटगे आता 3 सप्टेंबर रोजी शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे.
Edited by - Priya Dixit
