1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  4. Sanjay Rauts brothers tongue slips abuses Shinde groups women candidate

संजय राऊतांच्या भावाची जीभ घसरली, शिंदे गटाच्या महिला उमेदवाराला 'बकरी' अपशब्द उच्च्रारले

संजय राऊत यांच्या भावाने शिंदे गटाच्या महिला उमेदवाराला 'बकरी' असे अपशब्द उच्चारले असून, डोके टेकवावे लागेल असे देखील म्हणाले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांच्या बंधूने महिला उमेदवाराला बकरी असे शब्द उच्चरले आहे. महाराष्ट्र निवडणुकीत सध्या महिलांना अपमानास्पद शब्द उच्चरले जात आहे. यापूर्वी देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांना अपशब्द उच्चरले होते. तसेच आता संजय राऊत यांचे भाऊ आणि उमेदवार सुनील राऊत यांनी महिला उमेदवाराला 'बकरी' असे शब्द उच्चरले आहे.
 
तसेच शिवसेनेचे यूबीटी उमेदवार आणि संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी महिलांचा अपमान केला असून सुनील राऊत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला उमेदवाराला बकरी असे संबोधले आहे. तसेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने अपशब्द वापरले आहे.
 
संजय राऊत यांचा भाऊ सुनील राऊत यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला असून व्हिडीओमध्ये सुनील राऊत त्यांच्यासमोर उमेदवार नसल्याचे सांगत आहे. ते म्हणाले की, मी 10 वर्षे आमदार आहे. आता उमेदवार सापडला नाही म्हणून बकरी आणून माझ्यासमोर उभी केली. अशा स्थितीत आता बकरी पुढे आल्याने बकर्याला डोके टेकवावे लागणार आहे असे देखील ते म्हणाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे विक्रोळी विधानसभेतून तिसऱ्यांदा शिवसेनेचे यूबीटी उमेदवार आहे. केवळ निवडणूक जिंकणार नाही तर मंत्रीही होणार असल्याचे ते म्हणाले. तर शिवसेनेच्या शिंदे गटाने सुवर्णा करंजे यांना उमेदवारी दिली आहे.  

Edited By- Dhanashri Naik 
पुढील लेख
शिवसेना UBT 99 किंवा 105 जागांवर निवडणूक लढवणार, संजय राऊत म्हणाले, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल