1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2024 (19:49 IST)

विधानसभा निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले यंदाच्या लढा विश्वासघात, फसवणूक आणि लाचारी विरुद्धचा असणार

uddhav thackeray
आज वसंत मोरे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी बोलताना ते म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला दाखवले आहे. संविधान आणि लोकशाही धोक्यात आली होती. यंदाची निवडणूक देशाच्या संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करणारी होती. 

आताची विधानसभा निवडणूक विश्वासघात, फसवणूक आणि लाचारीच्या विरुद्ध लढणारी असेल. 
पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी शिवसेनेत (यूबीटी) प्रवेश केल्यानंतर मातोश्रीवर जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी या गोष्टी सांगितल्या. यावेळी पक्षाचे नेते संजय राऊत हेही मातोश्रीवर उपस्थित होते.
 
लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोडली होती आणि पुण्यातून वंचित बहुजन आघाडी कडून निवडणुकीत लढले होते. आता वसंत मोरे यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

 Edited by - Priya Dixit