1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (17:36 IST)

विधानपरिषद निवडणुकीत नवाब मालिकांचे मत मोलाचे का?

nawab malik
महाराष्ट विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नवाब मालिकांच्या बाबतीत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यांचे एक मत महत्त्वाचे म्हटले जात आहे. अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर बैठक झाली या बैठकीला नवाब मलिक यांची उपस्थिती होती. या मुळे नवाब मलिक अजित पवार यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत नवाब मालिकांचे एक मत मौल्यवान म्हटले जात आहे. 
 
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होत आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेचे संख्याबळ 274 आहे. विधानपरिषदेची एक जागा जिंकण्यासाठी 23 मतांची आवश्यकता असते. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत महायुतीचे भाजपचे 5, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट 1 , काँग्रेसचा 1 आणि शेकापचे 1 उमेदवार निवडणुकीचा रिंगणात आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. 

विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान केले जाते.2022 च्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करण्यात आले होते.जवळपास सर्वच पक्षांना क्रॉस व्होटिंगचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादीचा (एपी) उमेदवार निवडणुकीत पराभूत होऊ शकतो, अशा परिस्थितीत अजित पवारांचा मते गोळा करण्याच्या प्रयत्नांत आहे. 
 
Edited by - Priya Dixit