1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र बजट
Written By
Last Updated : गुरूवार, 3 मार्च 2022 (16:33 IST)

”दाऊदच्या दलालांचा राजीनामा घ्या”, विधीमंडळाच्या भाजप नेत्यांच्या घोषणा

BJP leaders in the legislature demanding malik registration
महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन  आजपासून सुरु होत आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांनी नवाब मलिक हाय हाय… दाऊदच्या दलालांचा राजीनामा घ्या, अशी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला.
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांनी नवाब मलिक हाय हाय… दाऊदच्या दलालांचा राजीनामा घ्या, अशी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशीष शेलार, अतुल भातखळकर आदी नेते उपस्थित होते. भाजप नेत्यांच्या या आंदोलनात काही वेळानंतर देवेंद्र फडणवीसदेखील सहभागी झाले.