Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आजही गदारोळ होण्याची शक्यता
आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आज सभागृहात पुन्हा एकदा अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नवाब मलिक, ओबीसी आरक्षण यासह अनेक मुद्दे गाजू शकतात.
दरम्यान, आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन आज विधिमंडळात विधेयक मांडलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत शुक्रवारी घोषणा केली होती.
विरोधी पक्षाच्या निशाण्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आण अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आहेत. याआधी विरोधी पक्षानं महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. त्यामुळे आज अधिवेशनात सभागृहात मलिकांचा मुद्दा सर्वात जास्त गाजण्याची शक्यता आहे.