दादासाहेब फाळके चित्रसृष्टी

किशोर गांगुर्डे

MHNEWS
चित्रपटसृष्टीची पंढरी, मुंबई महानगराचं फुप्फुस आणि रूपेरी-चंदेरी दुनियेचं माहेर म्हणून मुंबईच्या चित्रनगरी अर्थात फिल्मसिटीची ओळख... भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने गोरेगावच्या जंगलात गेल्या ३१ वर्षांपासून चित्रसृष्टीमध्ये अमूल्य योगदान देणारी चित्रनगरी महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं सांस्कृतिक भूषण आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या या दादासाहेब फाळके चित्रनगरीत केलेल्या मुशाफिरीचा वृत्तांत...

दूरदर्शनवर किंवा थिएटरमध्ये पाहिलेल्या अनेक चित्रपटांच्या श्रेयनामावली मध्ये फिल्मसिटी किंवा चित्रनगरीचा उल्लेख हा हमखास असतोच. चित्रपट वेगळा, नायक वेगळा, कथा वेगळी आणि दृश्य वेगळी असली तरी प्रत्येक चित्रपटाच्या चित्रिकरणाचं स्थळ हे फिल्मसिटीच का? हा प्रश्न मला नेहमीच पडायचा. कृष्णधवल, ईस्टमनकलर-रंगीत-सिनेमास्कोप असे सर्व पण बहुतांशी चित्रपट फिल्मसिटीतच तयार होत असतील तर हे स्थळ नक्कीच जादूई मायानगरी असेल, असं मला सारखं वाटायचं. दरम्यान वर्तमानपत्र-मासिकांमधून फिल्मसिटीबद्दल वाचलं, तेव्हा थोडं-थोडं कळायला लागलं. फिल्मसिटी पाहायला जावं असं मनापासून वाटायचं, पण कामाच्या रगाड्यात तसा योग काही जुळून येत नव्हता....गेल्याच आठवड्यात महान्यूजच्या वाचकांना फिल्मसिटीचं थेट दर्शन घडावं, यासाठी चित्रनगरीत जाण्याचा योग आला.

मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर, आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या १०-१५ मिनिटाच्या अंतरावर गोरेगाव या उपनगरात दादासाहेब फाळके चित्रनगरी वसली आहे. सुरक्षा अधिकार्‍यांकडचे सोपस्कार पूर्ण केल्यावर निसर्गाची मुक्त उधळण झालेल्या या परिसरातून थेट चित्रनगरीच्या कार्यालयाकडं निघालो. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्याशी भेट झाली. श्री.पाटील यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पांमधून फिल्मसिटीबद्दलची माहिती मिळाली. मुंबईची दादासाहेब फाळके चित्रनगरी ही उभ्या देशाचं आकर्षणाचं केंद्र आहे. देशाचं सांस्कृतिक भूषण ठरलेल्या या चित्रनगरीनं नुकतीच आपल्या कारकिर्दीला ३१ वर्षे पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्याशी गप्पा मारत असतानाच बाहेर पावसाला सुरूवात झाली. सुरू झालेला पाऊस, थंड वातावरण, फिल्मसिटीचा निवांत परिसर आणि श्री.पाटील यांच्या ऑफिसमधला गरमागरम वाफाळलेला चहा एकंदर चांगलंच कॉम्बिनेशन जमलं.

आता पाऊस थांबला होता. क्षणाचाही विलंब न करता मी थेट चित्रनगरी याचि देही याची डोळा अनुभवावी म्हणून निघालो. सोबतीला तिथले जनसंपर्क व्यवस्थापक ओमकार सैनी होते. फिल्मसिटीच्या ऑफिसच्या थोडं पुढं गेल्यावर एक इमारत दिसली. तिथं ५० पेक्षा अधिक ए.सी. खोल्यांमध्ये मेक अपची सुविधा फिल्मसिटीनं उपलब्ध करून दिली आहे. इथं २४ तास गर्दी असते असं, तिथल्या एका ज्येष्ठ मेकअपमननं सांगितलं.

तिथून गाडीनं निघालो. रस्त्यानं जात असताना जोश मैदान दिसलं. तिथं मुड-मुड के ना देख या चित्रपटाचा सेट लावला होता. तंत्रज्ञांची धावपळ इथं सुरू होती. त्याला लागूनच वेलकम मैदान आहे. तिथंही सेट लावण्याचं काम सुरू होतं. बर्‍याच चित्रपट-मालिकांमध्ये वेगवेगळ्या अँगलमध्ये हे ठिकाण आपल्याला दिसतं. बाजूला वाघोबा मंदिर आणि नाल्याचं ते दृश्य मोठं मनोहारी वाटलं. तिथून पुढं कालिया मैदानावर कथा महाभारत की मालिकेचा सेट लागला होता. मालिकेतल्या साईड पात्रांचा या सेटवर संचार होता. अजून चित्रिकरणाला सुरूवात झालेली नसल्यामुळं मोह आवरून मी पुढच्या प्रवासाला निघालो. याच मैदानावर बीआर चोप्रांच्या महाभारतचं आणि अमिताभ बच्चनच्या कालियाचं शुटिंग झाल्याचं ओमकार सैनी यांनी सांगितल्यावर मला लगेच बी.आर.च्या त्या महाभारताचं अथ श्री महाभारत कथा, कथा है पुरूषार्थ की, परमार्थ की... हे टायटल साँग आठवलं.

पुढं लिंक रोड मैदानावर लम्हा या चित्रपटाचा सेट लागलेला होता अन् एका साईड सीनचं शुटिंग चाललं होतं. कोट्यावधी रूपये खर्चून बनवलेल्या देवदासचा सेट इथं लावला होता, हे सांगून सुध्दा कुणाचा विश्वास बसणार नाही, इतका अप्रतिम लूक या जागेला निर्मात्यानं दिला होता. बाजूची दरी, झाडं, निसर्गाचा निर्व्याज आनंद आणि बाजूला खळखळ वाहणार्‍या नाल्याचं दृश्य एखाद्या पौराणिक मालिकेतल्या दृश्यासारखंच होतं. याच ठिकाणी चाणक्य या सिरियलचं चित्रिकरण झाल्याचं समजलं. त्याच्या समोरचं अप्पू-पप्पू मैदानावरही कथा महाभारतचा सेट लागलेला होता. थोडंसं पुढं गेल्यावर एक सरोवर दिसलं. १९९० च्या दशकात दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर काश्मीरचा नजारा दाखविणार्‍या गुल-गुलशन-गुलफाम मालिकेतलं सरोवर, शिकारा आणि बर्फ पडतानाचं दृश्य या सरोवरात चित्रित केलं आहे, हे सांगूनसुद्धा कुणाला पटणार नाही. निळंशार संथ पाणी पाहिल्यावर हे सरोवर कृत्रिम आहे, असं सांगितलं तर पाहणारा आश्चर्यचकित होतो. १९४१ अ लव्ह स्टोरी आणि श्याम बेनेगलांनी सतत १९ महिने इथं द डिस्कव्हरी ऑफ इंडियाचं शुटिंग केलं होतं. अशी ही निवांत जागा, पाहणार्‍याच्या सदैव लक्षात राहील, अशीच आहे.

पुढंची बापूनगरची टेकडी ही उंचावरची जागा सेकंड हेलिपॉड म्हणून ओळखली जाते. तिथून उजव्या दिशेने पुढं गेल्यावर हेलिपॉड कडं जाणारा रस्ता दिसला. नागमोडी रस्ते आणि दाट झाडांचा हा परिसर पाहण्यासारखा आहे. हेलिपॉडच्या समोरची खोल दरी आणि धुक्यात हरवलेलं विहार लेक, पवई लेक तिकडच्या इमारतींचं दृश्य मोठं विहंगम होतं. तिथून पुढं गेल्यावर नागमोडी वळणाचा रस्ता, ब्रीज, दरी आणि एकूणच खंडाळा घाट इथं आहे. या लोकेशनवर विविध अँगलने शुटिंग करता येत असल्याने चित्रपटसृष्टीत या लोकेशनला प्रथम पसंती असते. अनेक जुन्या-नव्या चित्रपटांमध्ये इथलं दृश्य आपल्याला दिसतं. तिथून पुढं गेलं की, प्रती काश्मिर जिथं तयार करतात, तो स्पॉट दिसला. बर्‍याचशा चित्रपटांमध्ये बर्फ पडत असतानाचं चित्रीकरण इथंच केलं जातं. त्याच्या पुढं मंदिराचं एक स्ट्रक्चर तयार असून कधी वैष्णोदेवी तर कधी गुरूद्वारा, कधी साईबाबा मंदिर तर कधी शिव मंदिराचा आभास निर्माण करून स्क्रीप्टनुसार इथं मंदिरात चित्रीकरण केलं जातं. विशेषत: भक्तिगीतांचं चित्रीकरणासाठी हा स्पॉट वापरला जातो.

त्याच्या पुढेच दिसलं ते पोलीस स्टेशन. खरंखुरं नव्हे तर पोलीस स्टेशनचा सेट अप केलेलं हे पोलीस ठाणं, बहुतांशी चित्रपट-मालिकांमध्ये आपल्याला दिसतं.त्याच्या बाजूला गाव, घरांचा सेट तयार केला होता. बाजूचं नवीन गार्डन चांगलंच सुशोभित केलेलं आहे. मुंबईच्या चित्रनगरीत जसं काश्मीर तयार करता येतं, तसं इथं सिमला-मसुरीदेखील वसवता येतं. याचा प्रत्यय रिझरवायर गार्डनजवळ गेल्यानंतर आला. बागबान, क्रिश सारख्या चित्रपटांचं चित्रीकरण इथं झालं आहे. मेक अपरूम-रिसॉर्टस च्या गेटच्या मागच्या बाजूनं विहार लेकचा व्ह्यू फिल्मसिटीच्या सफरीत अजूनच रंग भरतो.

या फिल्मसिटीतला क्रमांक ७ चा स्टुडिओ म्हणजे मल्टी फॉसिलिटेड स्टुडिओ आहे. एका बाजूला कायमस्वरूपी लावलेला तुरुंगाचा सेट, कोर्ट, पुरानी हवेली, चर्च, मुंबईची चाळ निर्माण केली आहे. चित्रपट करताना इथला तुरूंग कधी हिरापूर तर कधी रामपूरचा तुरूंग होतो. चित्रपट सृष्टीत करियर करायच्या उद्देशाने येणारे स्ट्रग्लर्स प्रचंड मेहनत करताना इथं दिसले. स्पॉटबॉय पासून क्रेन ऑपरेटर, कॉमेरामन, मेक अपमन असे विविध टेक्निशियन २४ तास (तीन शिफ्टमध्ये) इथं काम करताना दिसतात. चित्रनगरीचा फेरफटका मारताना सुरक्षा यंत्रणाही उत्तम पद्धतीने कार्यन्वित केलेली दिसली. येणार्‍या-जाणार्‍यांवर खास ठिकठिकाणी बसवलेले क्लोज सर्किट टीव्ही कॉमेरे गुप्त नजर ठेवून आहेत.

एकूणच, दादासाहेब फाळके चित्रनगरीचं सर्व वातावरण रूपेरी-चंदेरी असंच आहे. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या स्थळांमुळे आणि तेथील अत्याधुनिक सुविधांमुळे चित्रनगरीत चित्रीकरणासाठी गजबज वाढू लागली आहे.चित्रपट किंवा मालिकेच्या निर्मितीच्या प्रत्येक क्षणांना अधिक आकर्षक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात चित्रनगरीची भूमिका मोलाची ठरली आहे.
किशोर गांगुर्डे| वेबदुनिया|
महान्यूजकडून साभार...


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन
हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं वयाच्या 88 ...