स्वित्झर्लंड

पृथ्वीवरचा स्वर्ग

वेबदुनिया|

स्वित्झर्लंड हिमशिखरे व सुंदर वनश्रीने नटले आहे. येथील पर्वत शिखरांवर वर्षातील आठ महिने बर्फाची सुंदर चादर असते. हिंदी चित्रपटांमधून येथील नयनरम्य दृष्ये आपण अनेकदा पाहिलेली आहेत. ते बघून सौदर्यानं नटलेल्या या प्रदेशात फिरण्याची इच्छा नक्कीच झाली असणार. त्याचीच माहिती या भागात घेऊया.


प्रमुख प्रेक्षणीय स्थळे -

इंटरलेकन ओस्ट- हे बॉलीवूडचे आवडते ठिकाण आहे. दिलवाले दुल्हनियॉं ले जायेंगे, ढाई अक्षर प्रेम के, जुदाई, हिरो या चित्रपटांचे चित्रिकरण येथे झाले. नैसर्गिक सौदर्याने नटलेल्या या शहरात आपण स्वित्झर्लंडचा इतिहास व वर्तमान दोन्ही अनुभवू शकतो.
सूर्योदयाच्या वेळेस येथील डोंगरांवर फिरण्याचा अनुभव अवर्णनीय असतो. या डोंगरांवर जाण्यासाठी ट्रेनही उपबध आहे. येथील पर्वतांवरून निसर्गसौदर्य अनुभवणे निव्वळ अप्रतिम.

जंगफ्रोज - शहरातून फिरून झाल्यानंतर आपण जंगफ्रोजला जाऊ शकता. समुद्रसपाटीपासून ३ हजार ४५४ मीटर उंची असलेली ही युरोपातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. येथे युरोपमधील सर्वांत उंच रेल्वे स्टेशनही आहे. इंटरलेकन स्टेशनहून येथे येण्यासाठी ट्रे‍न मिळते.
या ट्रेनमधून प्रवास करताना आसमंतात पसरलेलं निसर्गसौंदर्य आपण डोळ्यात साठवू शकतो. बर्फाने नटलेल्या पर्वतरांगा पार करत जाणार्‍या ट्रेनमधून दिसणारी दृश्ये कॅमेर्‍यात टिपू शकतो. उन्हाळ्याची चाहूल लागली की आईस स्कीईंगचा आनंद घेता येतो.

येथील बर्फावर सूर्याची तिरपी किरणे पडून घडणारा रंगाचा सोहळा अवर्णनीय असतो. जंगफ्रोज येथे बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांचे चित्रिकरण झाले आहे. त्यामुळे येथे बॉलीवूड रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे. एप्रिलच्या पंधरा तारखेपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत हे रेस्टॉरंट खुले असते. याशिवाय आइस पॅलेसही जंगफ्रोज येथील आकर्षणाचे केंद्र आहे.
शिल्थॉर्न हिमशिखर - जंगफ्रोजशिवाय शिल्थॉर्न हिमशिखरांचा रस्ताही इंटरलेकन ओस्ट येथूनच जातो. जगातील सर्वांत सुंदर हिमशिखरांत यांचा समावेश होतो.

टिटलिस पर्वतरांग - केबल कारमध्ये बसून टिटलिस हिमशिखरांचे सौदर्य न्याहाळण्याचा अनुभव सुखद असतो. केबल कारच्या प्रवासात स्वित्झर्लंडमधून जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्टचे दृश्य डोळ्यांना सुखावते. येथील ग्लॅशियर पार्कमध्ये फिरायला विसरू नका. मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत हा पार्क खुला असतो.
ग्रोटो हिमशिखर - येथे बर्फात बनलेल्या सुंदर गुहा आहेत. या गुहांच्या बर्फाच्या भिंतींवर साडेआठ हजार दिवे प्रकाश उधळीत असतात. येथे हॉल ऑफ फेमसुद्धा आहे. स्वित्झर्लंडला आलेल्या प्रमुख व्यक्तींचे छायाचित्र येथे लावण्यात आले आहे. करिश्मा कपूरपासून ‍वीरेंद्र सेहवागपर्यंत अनेक भारतीयांचे पारंपारिक स्विस पेहरावातील छायाचित्र येथे लावण्यात आले आहे.
मॅटरहॉर्न - आपल्याला साहसी खेळाची आवड असेल तर मॅटरहॉर्नला अवश्य भेट द्या. साहस करतानाच हिमशिखरांचे सौदर्य जवळून न्याहाळायचे झाल्यास मॅटरहार्न क्लायंबर्स क्लबचे सदस्यत्वही घेता येते. युरोपमधील सर्वांत मोठा आइस स्कींईंग झोन येथेच आहे.

ग्रोरनग्रेट - ग्रोरनग्रेटला अल्पाइनचा स्वर्ग म्हटले जाते. हिवाळ्यात बर्फाची चादर ओढणारे हे हिमशिखर उन्हाळ्यात रंगीबेरंगी फुलांनी बहरून येते. रिगी फोलकरोलेचा प्रवास संगीत प्रेमींच्या नेहमी करिता आठवणीत राहू शकतो. स्विस सरकार दरवर्षी जुलै महिन्यात येथे संगीत सोहळा भरविते.
रिगी कुलम - निळ्याशार निर्झरांसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. ल्यजरॅन शहरातून येथे पोहचण्यासाठी कार, केबलकार किवा बोट इत्यादी साधने उपलब्ध आहेत. येथे स्टी‍म ट्रेन मधून प्रवास करायला विसरू नका. बॅली यूरोप सॅलून रेल कार नावांची ट्रेन पन्नासच्या दशकातील राजवैभवाचा अनुभव देते. येथील दुर्मिळ महोगनी फर्निचर, ब्रांझ वर्क, लाल गालिचा व सुरू असलेले पार्श्वसंगीत आपल्याला अनोख्या दुनियेत घेऊन जाते.

भेट द्यायची उत्तम वेळ -

स्विर्त्झलँड प्रत्येक ऋतुमध्ये सौंदर्याची बरसात करतो. परंतु, हिवाळ्यात येथे जाऊ नका. यावेळेस आपण मुक्तपणे येथील सौंदर्य अनुभवू शकणार नाही. आइस स्कीईंगचा आनंदही घेऊ शकणार नाही. स्वित्झर्लंडमध्ये आपणं बोट, ट्रे‍न व कारने प्रवास करू शकता. येथे सहजपणे भाड्याने कार मिळते.
स्वित्झर्लंडला नै‍सर्गिक सौदर्य तर लाभले आहेच, परंतु येथील सरकारही विशेष लक्ष घालते. पर्यटकांसाठी येथील हिमशिखरांवर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ज्युरिच, ल्यूजरेन, इंटरलेकन या शहरांमध्ये पर्यटक केंद्र आहे. आपल्याला पर्यटनासंबंधी सर्व माहिती सहजपणे मिळते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...