शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : सोमवार, 11 मार्च 2024 (13:12 IST)

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ८ हिल स्टेशन जे आज पण लोकांच्या नजरेपासून दूर आहेत

matheran
Best Hill Stations In Maharashtra : उन्हाळ्यात फिरण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे हिल स्टेशन असतात. फिरायला जायचे आहे आणि मनात हिल स्टेशन नाव येणार नाही असे होणार नाही. तसेच तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर ही चांगलीच गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रात असलेले हिल स्टेशन यांसारखे दुसरीकडे असतीलच असे नाही. 
 
भारताच्या नकाशाला व्यवस्थित पाहिले तर माहिती समजते की महाराष्ट्र हे राज्य देशातील सर्वात जास्त उष्णता झेलणार्या राज्यांपैकी एक राज्य आहे. पण प्रकृतिच्या कमालीमुळे महाराष्ट्रात आज पण असे काही स्थळे आहेत जिथे वर्षभर थंड वातावरण असते. चला तर जाणून घेऊ या महाराष्ट्रातील सुंदर असे हिल स्टेशनजे आज पण लोकांच्या नजरेपासून दूर आहे. 
 
सुंदर आणि शांत हिल स्टेशन-
लोणावळा- सामान्य माणसापासून तर सेलीब्रेटीपर्यंत प्रत्येकाची पहिली पसंती लोणावळा हे पर्यटकांच्या मनात एक वेगळी छाप उमटवतो. तसेच सोबतच रस्त्यात लागणारे टाइगर पॉइंट, कोरिगाड किल्ला, भुशी बांध आणि कोंडानाच्या गुफा या ट्रिपला अजून सुखकारक बनवतात. 
 
जवाहर- जवाहर पण एक वर्थ सिइंग हिल स्टेशन आहे. येथील मोहक धबधबे आणि हिरवेगार डोंगररांगा या स्थळाला अजून सुंदर बनवतात. तसेच सनसेट पॉइंट, खडखड डैम आणि कलमन देवी धबधबा येथील मुख्य पर्यटन जागा आहे. 
 
महाबळेश्वर-  निसर्गाच्या कुशीत वसलेले हे हिल स्टेशन महाराष्ट्राचा जीव आहे. महाबळेश्वरला ते सर्व आहे जे आपल्याला उन्हाळ्यात उष्णते पासून आराम देते. मोठया मोठया रिसोर्ट्स पासून तर छोट्या छोट्या हॉटेल्स पर्यंत आपल्या आतामध्ये समाविष्ट असलेले महाबळेश्वर प्रत्येक व्यक्तीच्या बजेटची काळजी घेते. 
 
माथेरान-  माथेरान येथील सुंदरता आणि हिरवळ ही लक्षणीय आहे. जर तुम्हाला माथेरान फिरायचे असेल तर इथे चलणारी टॉय ट्रेन तुम्हाला फिरवू शकते. तसेच सह्याद्रि पर्वत रांगांवर ट्रेकिंग करणे मथेरानच्या ट्रिपला अजून उतेज्जीत करते. 
 
सावंतवाडी- महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असलेले हे छोटेसे हिल स्टेशन खूप रमणीय आहे. एका बाजूने समुद्री किनारा आणि दुसऱ्या बाजूने सह्याद्री पर्वत रांगा याने घेरल्या मुळे इथे बाराही महीने थंडी असते. तसेच येथील हिरवीगार हिरवळ, शांत सरोवरे आणि ऐतिहासिक मंदिर तुम्हाला वास्तविक सुख प्रदान करते. मोती सरोवर आणि सवंतवाडी पॅलेस येथील मुख्य पर्यटन स्थळे आहे.
 
इगतपुरी- इगतपुरी येथील घनदाट हिरवे जंगल आणि राजसी डोंगररांगा या स्थळाला अजुन रहस्यमय आणि आकर्षक बनवतात. इथे होणारी कैंपिंग आणि राफ्टिंग खूप ही मनोरंजक असते. कैमल वैली, त्रिंगलवाड़ी किला आणि कळसुबाई शिखर येथील काही  मुख्य आकर्षण केंद्र आहे. 
 
खंडाळा आणि माळशेज घाट-  खंडाळा आणि माळशेज घाट हे असे थंड हवेचे ठिकाण आहे ज्यांना पाहिल्यावर तुम्ही त्यांच्या प्रेमातच पडाल. इथे तुम्ही हिरव्यागार डोंगररांगा , धबधबे, डैम्स, ऐतिहासिक किल्ले, तसेच ट्रेकिंग, कैंपिंग, राफ्टिंगचा आनंद घेऊ शकतात. आणि तुमच्या ट्रिप मधील क्षण आठवणीत राहतील . 
 
तसे तर तुम्ही पूर्ण वर्षात केव्हावी या थंड हवेच्या स्थळांना भेट देऊन आनंद घेऊ शकतात. पण तसे पाहिला गेले तर उन्हाळ्यात गेल्याने आपल्याला उष्णतेपासून आराम मिळतो.

Edited By- Dhanashri Naik