सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला जाणार? प्रवासापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?
Ai Image
महत्त्वाच्या पर्वण्या व शाही स्नान: जर तुम्ही शाही स्नानासाठी जात असाल, तर प्रशासनाने जाहीर केलेल्या तारखा नक्की तपासून घ्या. शाही स्नानाच्या दिवशी अतिप्रचंड गर्दी असते.
सामान्य स्नानाचे दिवस: जर तुम्हाला गर्दी टाळून दर्शन आणि स्नान करायचे असेल, तर शाही स्नानाच्या मुख्य दिवसांऐवजी इतर दिवशी जाण्याचे नियोजन करा.
२. वाहतूक, मार्ग आणि पार्किंग नियम
वाहनांवरील निर्बंध: कुंभमेळा काळात नाशिक शहर व त्र्यंबकेश्वरमध्ये खाजगी वाहनांना थेट घाटापर्यंत जाण्यास बंदी असते.
मार्ग बदल : प्रवासाला निघण्यापूर्वी नाशिक ट्रॅफिक पोलिसांची ताजी मार्गदर्शक नियमावली व बदललेले रस्ते तपासा.
३. राहण्याची व्यवस्था
अॅडव्हान्स बुकिंग: हॉटेल, लॉज, धर्मशाळा किंवा साधूग्राममधील टेंटचे बुकिंग आधीच पूर्ण करा.
लोकेशनची पडताळणी: तुमचे निवासस्थान मुख्य घाट (रामकुंड/कुशावर्त) किंवा बस स्टँडपासून किती अंतरावर आहे, हे तपासून घ्या.
वैद्यकीय किट : नियमित औषधे, प्रथमोपचार, ओआरएस आणि पेनकिलर्स सोबत ठेवा.
हवामानाचा अंदाज: हवामानानुसार रेनकोट, वॉटरप्रूफ बॅग किंवा टोपी/छत्री सोबत ठेवा.
चालण्याची तयारी: वाहनांना बंदी असल्याने ५ ते १० किमी चालण्याची मानसिक व शारीरिक तयारी ठेवा. आरामदायक शूज वापरणे योग्य ठरेल.
५. लहान मुले व वृद्धांची सुरक्षेबाबत काळजी
ओळखपत्र व संपर्क माहिती कार्ड: लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या खिशात किंवा गळ्यात नाव, पत्ता, आणि मोबाईल नंबर लिहिलेले कार्ड किंवा रिस्टबँड नक्की घाला.
एकत्र राहण्याचे ठिकाण : गर्दीत चुकून ताटातूट झाल्यास कुठे भेटायचे, हे ठिकाण आधीच ठरवून ठेवा.
६. रोख रक्कम आणि डिजिटल साधने
कॅश सोबत ठेवा: प्रचंड गर्दीमुळे अनेकदा मोबाईल नेटवर्क जाम होतात आणि UPI पेमेंट किंवा ऑनलाइन व्यवहार चालत नाहीत. त्यामुळे पुरेशी रोख रक्कम सोबत ठेवा.
पावर बँक : प्रवास लांबचा असल्याने फोन चार्जिंगसाठी पावर बँक सोबत असणे गरजेचे आहे.
प्रशासकीय अॅप / हेल्पलाईन: नाशिक पोलिस किंवा कुंभमेळा प्रशासनाचे अधिकृत ॲप, व्हॉट्सॲप हेल्पलाईन आणि आपत्कालीन नंबर फोनमध्ये सेव्ह करून ठेवा.

