1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: गुरूवार, 13 एप्रिल 2023 (12:16 IST)

पुण्यातील हे मंदिर आठ महिने पाण्याखाली असते, आता वाघेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले

This temple in Pune is under water for eight months
महाराष्ट्रातील पुण्यातील वाघेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होत आहेत. हे मंदिर अतिशय ऐतिहासिक असून पवना धरणाच्या आत बांधलेले आहे. यामुळे मंदिर 8 महिने पाण्यात बुडून असतं तर फक्त 4 महिने पाण्याबाहेर असतं. हे अनोखे मंदिर पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पवना धरण 1965 मध्ये बांधण्यात आले होते. सन 1971 पासून ते वापरले जात आहे. तेव्हापासून हे ऐतिहासिक मंदिर पाण्यात बुडाले आहे. पवना धरणाच्या आवारात बांधलेले हे मंदिर उन्हाळ्यात तीन-चार महिने पाणी ओसरल्यावरच दिसते.
 
यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस हे मंदिर पाण्याबाहेर आले. हे मंदिर सुमारे 700 ते 800 वर्षांपूर्वी हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.
 
संशोधकांचा दावा आहे की मंदिराचे बांधकाम 11 व्या ते 12 व्या शतकातील असावे कारण मंदिराच्या बांधकामात दगड एकत्र जोडले गेले होते. त्यावर काही शिलालेखही सापडले आहेत. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडाने करण्यात आले आहे. सध्या या मंदिराचा फक्त ढाचा शिल्लक आहे. मंदिर जुने असल्याने त्यातील बहुतांश भाग जीर्ण झाला आहे. आजूबाजूच्या भिंतींच्या खुणा अजूनही आहेत.
 
मंदिराचा कळस उद्ध्वस्त झाला असून केवळ सभामंडप जरा स्थितीत आहे. या मंदिराभोवती सर्वत्र भेगा पडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोकण सिंधुदुर्ग मोहीम संपवून वाघेश्वराच्या मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या दर्शनासाठी सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत. या ऐतिहासिक मंदिराचे पुरातत्व विभागाने संरक्षण करावे अशी भाविकांची श्रद्धा आहे.