महाराष्ट्र दिवस : देशा, नाव तुझं माझिया ओठी
मंगल देशा, नाव तुझं माझिया ओठी,
धन्य जाहले जीवन हे, जन्मलो तुझ्या पोटी,
कणखर डोंगर, खोल दऱ्या वैभव आपुले,
महाराष्ट्राची शान आहेत कित्ती तरी किल्ले!
मातीत तुझ्या सापडलेत
रत्ने मौल्यवान,
लेखक, कवी, गायक, वादकानी वाढविला मान,
खेळाडूंनी मान आपली कित्ती उंचावली,
आणिक ही गुणी खेळाडूंनी मैदाने गाजविली,
शेतकरी ही कष्टकरितो ,सोनं पिकवितो,
कामगार ही आपुला कित्ती घाम गाळीतो,
कित्ती तरी श्रेष्ठ वैज्ञानिक झाले,
मान महाराष्ट्रा चा वाढवुन गेले.
संत महंतांनी केली ही पावन धरती,
अनेक तीर्थक्षेत्र आजही वाढवीत आहे कीर्ती,
ऋणातून या सर्वांच्या मुक्त न व्हायचे,
ऋणात राहून या सकलांच्या, गुणगान गायचे!
...अश्विनी थत्ते