शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (08:51 IST)

टीचर्स स्पेशल ट्रेन या दिवशी सुटणार

train
उत्तर प्रदेशला जाणाऱ्या शिक्षकां मोठी गैरसोयहोऊ नये यासाठी .महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद टीचर्स स्पेशल ट्रेन सुरु व्हावी यासाठी प्रयत्नशील होती. 30 मार्च 2022 रोजी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन दिले होते. त्यानुसार एक शिक्षक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवनाथ दराडे यांनी केले आहे. 
 
यासंदर्भात ॲड.आशिष शेलार यांनी 20 एप्रिल 2022 रोजी रेल्वे मंत्र्यांकडे पत्र व्यवहार केला होता. ॲड.आशिषजी शेलार यांनी यामध्ये व्यक्तिगत लक्ष घालून शिक्षकांची होणारी गैरसोय रेल्वेमंत्रालयाला अवगत केली. रेल्वे बोर्ड सदस्य कैलास वर्माजी, भाजपा नेते संजय उपाध्याय, आर.यू. सिंह, संजय पांडे व अमरजीत मिश्रा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी व्यक्तिगत संपर्क साधून टीचर्स स्पेशल ट्रेन करिता प्रयत्न केले. रेल्वे मंत्र्यांचे खाजगी सचिव यांनी या विषयात व्यक्तिगत लक्ष घातले. गाडी नंबर 01053 या टीचर्स स्पेशल ट्रेनचे आरक्षण 29 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष सुरु होणार आहे.
 
ही शिक्षक विशेष गाडी कुर्ला ते बनारस अशी असून 2 मे 2022 रोजी कुर्ला एलटीटी स्थानकावरुन सुटणार आहे. या संदर्भातला संपूर्ण तपशिल रेल्वे पुढील एक-दोन दिवसात जाहीर करणार आहेत. आरक्षणाचे नियम पुर्वीप्रमाणे असल्याचे रेल्वेकडून सांगितले आहे. त्यामुळे शिक्षकांनी उद्यापासून आपल्या आरक्षणासाठी संबंधीत वेळेत उपस्थित राहून आपले आरक्षण नक्की करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केले आहे.