अरूण दातेंचे चिरंजीव 'मनसे' मध्ये
ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे पुत्र संगीत दाते यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मनसे'त प्रवेश केला.
महागायिका वैशाली भैसणे-माडे हिने रविवारी राज ठाकरे यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केल्याचे सांगण्यात येत असून येत्या एक-दोन दिवसात वैशाली माडे मनसेत अधिकृतरित्या प्रवेश करेल असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन समजते. इंडियन आयडॉल अभिजीत सावंत आणि 'भाऊजी' फेम आदेश बांदेकर यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानंतर मनसेने वैशाली माडेला पक्षात स्थान देण्याचे निश्चित केले असल्याचे समजते. निवडणूकीच्या या धामधूमीत जास्तीत जास्त सेलिब्रिटी आपल्या पक्षात घेण्याची ओढ सर्व पक्षांमध्येच सुरु आहे.
संगीत दाते यांच्या मनसेच्या प्रवेशाच्या वेळी अरुण दाते, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर आणि कविवर्य मंगेश पाडगावकर उपस्थित होते.