आदेश बांदेकर शिवसेनेत
PR
PRआपण लहानपणापासूनच शिवसैनिक असून आज फक्त त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करीत आहोत, अशी प्रतिक्रिया बांदेकरांनी प्रवेशानंतर व्यक्त केली. मराठी माणसाच्या हितासाठी या मराठी माणसांच्या पक्षात आल्याचे ते म्हणाले.
'होममिनिस्टर' या कार्यक्रमाद्वारे घरोघर पोहोचलेल्या बांदेकरांनी शिवसेनाप्रवेशामागचा हेतू लोकांच्या समस्या सोडविणे हाच असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांचे प्रश्न मला कळले. ते सोडविण्याची इच्छा असल्यानेच राजकारणात आल्याचे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांदेकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार काय याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
