1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात

मुख्यमंत्री आज अर्ज दाखल करणार

राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे उमेदवारी दाखल करण्यासाठी दि.२३ सप्टेंबर रोजी नांदेड दौर्‍यावर येणार होते. पक्षाच्या उमेदवाराची यादी जाहिर न झाल्याने ते रात्री उशीरा नांदेड येथे येऊन उमेदवारी अर्ज दि.२४ सप्टेंबर रोजी दाखल करणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आल्यानंतर यावेळच्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. यावेळी ते भोकर विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असून ते प्रारंभी दि.२३ सप्टेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. परंतु काँग्रेसच्या उमेदवाराची यादी जाहिर न झाल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दि.२४ सप्टेंबर रोजी दाखल करण्याचा निर्णय घेतला.