गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. महाराष्ट्रातील किल्ले
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (13:43 IST)

सिंधुदुर्ग किल्ला

sindhudurg fort
हा किल्ला मराठा साम्राज्यासाठी एका शक्तिशाली किल्ला आहे. हा किल्ला इतर समुद्रीय किल्ल्यांपैकी एका आहे. हा सिंधुदुर्ग किल्ला मराठा साम्राज्याच्या सामर्थ्यवान नौदलाचा आधार होता. या गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पदचिन्हे असलेले एकमेव मंदिर आहे. 
 
हा किल्ला नौदलाच्या जहाजासाठी सुरक्षित आधार होते ह्याचे बांधकाम हिरोजी इंदलकरांच्या देखरेखीखाली 1664 मध्ये केले गेले. या किल्ल्याचे मुख्य उध्दिष्टये भारतातील वाढणाऱ्या परदेशी वसाहतीचे तुकडे करणे होते. हा किल्ला 48 एकराच्या परिसरात पसरला आहे. ह्याच्या भिंती 30 फूट उंच आहे.  
 
सध्या हा किल्ला मुख्य पर्यटन स्थळ बनलेला आहे. या किल्यावर पोहोचण्यासाठी घाट देखील उपलब्ध आहेत.

कसं जावं - 
सिंधुदुर्ग शहर, गोव्याच्या उत्तरेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईपासून 450 किमी  दूर दक्षिणेला आहे.इथे एक रेलवे स्थानक देखील आहे, परंतु  काही ठराविक गाड्याचं तिथे थांबतात.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ,कणकवली आणि सावंतवाडी प्रमुख रेलवे स्थानक आहे. 
रत्नागिरी,मुंबई,पुणे ,सांगली,कोल्हापूरआणि गोवा राज्य सरकार आणि वास्को,पणजी,मडगाव,पेरनेम पासून सिंधू दुर्ग पर्यंत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकार च्या बस आहे.सिंधू दुर्ग पासून 90 किमी दूर सावंतवाडी शहर हे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. 
 
प्रेक्षणीय स्थळे -
इथे बघण्यासारखे सिंधुदुर्गचे प्रवेश दार,खिंड,दुर्गा दरवाजा,मारुतीचे मंदिर, शिवराजेश्वरांचे देवालय आणि मंडपात महाराजांची बैठी प्रतिमा,ध्वजस्तंभ, तोफखाना,पायखाने, आहे.