सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (16:12 IST)

चंपा वरून राज ठाकरे यांना चंद्रकांत पाटील यांचे उत्तर

या विधानसभा निवडणुकीत ‘चंपाची चंपी’ करणार असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे येथे टीका केली होती, त्याला पाटील यांनी उत्तर दिले आहे. जर  राज ठाकरेंनी आपल्यासाठी दुसरा शब्द शोधून काढायला हवा होता, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
 
पाटील म्हणाले की, राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय छान असून, त्यांनी त्यांचा स्वतंत्र बाणा जपायला हवा होता. ‘चंपा’ हा शब्द सर्वप्रथम अजित पवार यांनी वापरला. तोच शब्द पुन्हा न वापरता राज यांनी माझ्यासाठी दुसरा एखादा शब्द शोधून काढला असता तर बरं झालं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. राज यांनी काहीतरी नवं बोलावं. तीच भाषा बोलू नये. कदाचित राज यांचा शब्दसंग्रह कमी पडला असावा. पण ते काहीही बोलले असले, तरी मी त्यांच्या पातळीवर येणार नाही, असं पाटील एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहे. पुढे पाटील म्हणाले की ठाकरे, अजित पवार माझी खिल्ली उडवत आहेत. तरीही मी किती कामं केली आहेत, याची लोकांना पूर्ण कल्पना असून, त्यामध्ये मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफीसारखे प्रश्न मी हाताळले. मतदारांना याबद्दल माहिती आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांना जनताच वेड्यात काढेल,’ असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.