मी कॉलर उडवणार नाहीतर चावून खाणारा हा माझा प्रश्न
सध्या राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केलेलं उदयन भोसले जोरदार चर्चेत आहेत. त्यात उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी फार प्रसिद्ध आहेत. मात्र कॉलर उडवण्याच्या त्यांच्या या स्टाईलवरुन अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, “ही माझी स्टाईल आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. दुसऱ्यांना काय करायचं?”
कशावरही चर्चा होते. मुद्द्यांचं राजकारण करु नका, तर समाजकारण करा. लोकं आशिर्वाद देतील.”
शरद पवार सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असल्याच्या चर्चेवर उदयनराजे भोसले काहीसे भाऊक झाले होते. ते पुढे म्हणाले की , शरद पवार मला वडिलांच्या स्थानी असून, लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेंबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी.