रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (15:38 IST)

नितेश राणे भाजपात, कणकवलीतून उमेदवारी अर्ज भरणार

कणकवलीत नितेश राणे यांनी भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. नारायण राणे यांच्या आधी राणे यांचा भाजपा प्रवेश झाला आहे. त्यामुळे नितेश राणे हे कणकवलीतून भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
 
नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध होता, आणि या विरोध लक्षात घेऊन, भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर नितेश राणे यांचा अखेर भाजपात प्रवेश झाला आहे. नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.