शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (16:21 IST)

सत्तेचे समसमान वाटप करण्यात यावे : शिवसेना

“यापूर्वी आमची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युलावर चर्चा केली होती. तसंच राज्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यावरही चर्चा करण्यात आली होती. आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समसमान वाटा महत्त्वाचा आहे.

उपमुख्यमंत्रीपद हे आमच्यासाठी दुय्यम आहे. सत्तास्थापनेचं सूत्र भाजपानं लेखी स्वरूपात दिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे,” अशी माहिती शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी दिली. “काही अपरिहार्य कारणांमुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला शक्य झाला नव्हता. आता सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” असंही त्यांनी नमूद केलं.