बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (15:07 IST)

अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार हे लिहून द्या: शिवसेना

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 105 जागा मिळाल्या आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. आम्हाला सत्तेमध्ये समान वाटा हवा आहे असं शिवसेनेनं भाजपला स्पष्ट सांगितलं आहे.
 
मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी देणार असाल आणि ते ही लिखित स्वरूपात लिहून देणार असाल तरच आम्ही तुमच्यासोबत सत्तेत येऊ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
 
इतर खातीही 50:50 टक्के द्यावीत हे असं शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी निवडून आलेल्या शिवसेना आमदारांची बैठक झाली.