1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

रामदास आठवले यांची छगन भुजबळ यांना ऑफर

Ramdas Athawale
शिवसेना जर छगन भुजबळ यांना पक्षात घेत नसेल तर त्यांनी रिपाइंत यावं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ज्यांना सेना-भाजपाचा पर्याय निवडायचा नाही त्यांनी रिपाइंचा पर्याय निवडावा असंही आठवलेंनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ हे बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत त्यांचे आणि माझे संबंध फार पूर्वीपासून चांगले आहेत त्यांना शिवसेना पक्षात घेत नसेल तर त्यांनी रिपाइंत यावं ते आरपीआयमध्ये आले तर आरपीआयची ताकद वाढेल असंही आठवले यांनी म्हटलं आहे.शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांना ही ऑफर दिली आहे.
 
राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज नेते पवारांची साथ सोडून भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. १ सप्टेंबर रोजीही अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अशात छगन भुजबळ हे देखील शिवसेनेत जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.