शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (10:32 IST)

उदययनराजे यांच्या दोन मुख्य अटी त्यामुळे भाजप प्रवेश लांबला

राष्टवादीला धक्का देत खासदार उदयनराजे यांनी भाजपाची वाट धरली आहे. मात्र त्यांच्या दोन अटींमुळे त्यांच्या भाजप प्रवेश लांबला आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मात्र उदयनराजेंच्या अटींवर ठोस निर्णय न होऊ शकल्यामुळे काहीही निर्णय होऊ शकला नाही. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा दिल्लीत होईल हे यापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. पण उदयनराजेंच्या आणखी काही अटी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच व्हावी सोबतच पोटनिवडणुकीत अपेक्षित निकाल न आल्यास राज्यसभेवर नियुक्ती करण्यात यावी अशी अट उदययन राजे यांनी टाकली आहे असे समोर येते आहे. मात्र या अटींवर योग्य चर्चा झाली नाही त्यामुळे उदययन राजे भोसले यांचा प्रवेश लांबला आहे. आता मुख्यमंत्री जेव्हा निर्णय घेतील तेव्हा  उदययन राजे यांचा प्रवेश होणार आहे.