मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (10:20 IST)

अमोल कोल्हे सोशल मीडियावर ट्रोल

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. ‘मराठी टायगर्स’ चित्रपटातील ‘हुरहुर लागे श्वासांना’ हे गाणं पन्हाळा गडावर शूट झाल्याचं सांगत कोल्हेंनाच टीका केली जात आहे.
 
‘हुरहुर लागे श्वासांना’ या गाण्याचं चित्रिकरण पन्हाळा गडावर झाल्याचं सांगत नेटिझन्सनी डॉ. अमोल कोल्हेंसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. गड किल्ल्यांविषयी पुळका आहे, मग चार वर्षांपूर्वी गड किल्ल्यांवर या रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण कसं केलंत? हा प्रश्न विचारला जात आहे.
 
कोल्हापुरातील पन्हाळा गडावर हे गाणं कधी शूट झालं? त्यावेळी अमोल कोल्हे कुठल्या पक्षात होते किंवा ते आता कुठल्या पक्षात आहेत, यापेक्षा त्यांनी पवित्र गड-किल्ल्यांवर अशी गाणं चित्रित करण योग्य आहे का? हा प्रश्न विचारले जात आहेत.