गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (10:21 IST)

उदयन राजे भोसले सह अनेक करणार भाजपात प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी, काँग्रेसमधील अनेक नेते पक्षातून बाहेर पडत आहेत. येत्या १ आणि ५ सप्टेंबरला अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे सूत्रांकडून समजते. यामुळे काँग्रेस आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.  
 
सोलापुरात १ सप्टेंबरला भाजपच्या महाजनादेश यात्रेसाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत तर ५ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश होणार आहेत.
 
यावेळी खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, सिद्धराम म्हेत्रे उस्मानाबादमधील राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह हे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
 
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे.