रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (16:30 IST)

'म्हणून' त्याने पत्नीचा खून केला

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीचे आजारपण आणि तिला होणाऱ्या वेदना  बघवल्या गेल्या नसल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून केला. त्यानंतर पतीने स्वतःच्या हाताची नस कापत गळफास घेऊन आत्महत्या केली. वृषाली लाटे आणि संजय लाटे असे मयत पती पत्नीची नावे आहेत. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून यात वृषालीची सध्याची अवस्था बघवत नसून तिच्यावर अतोनात प्रेम आहे त्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. 
 
मयत वृषाली या आजारी होत्या त्यांना खूप वेदना व्हायच्या, त्यांच्या वेदना मयत पती संजय यांना बघवत नव्हत्या. घरात ते दोघेच असायचे, त्यांना मुलबाळ नाही. संजय हे एका नामांकित कंपनीत कामाला होते. मंगळवारी देखील पत्नी वृषाली यांना खूप वेदना होत होत्या. त्यावेळी वेदना बघवत नसल्याने संजयनी मध्यरात्री वृषालीच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी करून खून केला, त्यानंतर स्वतःदेखील हाताची नस कापत गळफास घेऊन आत्महत्या केली.