1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2019 (16:53 IST)

म्हणून चक्क कारचे लाईट लावून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले

funeral in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवड मध्ये चक्क कारचे लाईट लावून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळीच स्मशानभूमीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने ही वेळ नातेवाईकांवर आल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरीतला उच्चभ्रू परिसर असलेल्या वाकडमध्ये हा प्रकार घडला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. 
 
पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. याच परिसरात स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडित झाल्याने चक्क चारचाकी वाहनांच्या लाईटवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. वीज नसल्याने परिसरात काळोख पसरला होता. त्यामुळे स्मार्ट हा शब्द पिंपरी-चिंचवड शहराला शोभतो का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.