संबंधित माहिती
- संतापजनक, भुताची भीती दाखवत मुलीवर बलात्कार
- पुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर
- Maharashtra HSC Result 2019: बारावीचा निकाल जाहीर
- सुरत क्लासेस आग प्रकरण, सर्वाधिक क्लासेस असलेल्या लातूर मधील क्लासेस, कॉलेजला आयुक्तांची तंबी
- मित्रांनी पाजली तिला दारू आणि केला तिच्यावर बलात्कार पुण्यातील घटना
लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे आणि त्यामुळे झालेल्या मानिसक छळाला कंटाळून एका महिलेने शेवटी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला.
ही घटना पिंपरी येथील असून तिच्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
35 वर्षीय प्रियंका केदार पेटकर शरीराने जरा जाड होती यामुळे सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. जाड असल्यामुळे माहेरहून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ करण्यात येत होता. माहितीनुसार तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला गेला. जाड असल्यानं होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून शेवटी तिने गळफास लावून आत्महत्या केली.
या प्रकरणी प्रियंकाचा भाऊ पुष्कराज नंदकुमार प्रभुणे यांच्या फिर्यादावर पती केदार श्रीकांत पेटकर, सासू सुरेखा श्रीकांत पेटकर, सासरा श्रीकांत विश्वनाथ पेटकर आणि जगदीश माडीवाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंकाने 26 मे रोजी माहेरी असताना आत्महत्या केली. याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.
