रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (09:37 IST)

सुरत क्लासेस आग प्रकरण, सर्वाधिक क्लासेस असलेल्या लातूर मधील क्लासेस, कॉलेजला आयुक्तांची तंबी

शहरातील सर्व कोचिंग क्‍लासेस संचालक, अभ्‍यासिकाचालक यांनी सुरक्षे संबंधी उपाय-योजना करण्याबाबत आयुक्त एम डी सिंह यांनी बैठक घेतली असून त्यांना तंबी दिली आहे. नुकत्याच सुरत येथे कोचिंग क्‍लासेसला लागलेल्‍या भीषण आगीच्‍या घटनेनंतर देशामध्ये अशा प्राकारच्या घटनांना आळा बसावा याकरिता उपाय योजना आखल्या जात आहेत, त्याच आधारे आज लातूर शहर महानगर पालिका आयुक्त एमडी सिंह यांनी शहरातील सर्व संचालक, कोचिंग क्‍लासेस, अभ्‍यासिका, मुलाचे-मुलींचे वसतीगृह (सरकारी आणि खाजगी) यांनी सुरक्षेसंबंधी उपाय-योजना कशाप्रकारे केलेली आहे याची माहिती घेण्याकरिता बैठक घेतली. अग्निशमन यंत्रणा अद्यावत आहे किंवा नाही याची माहिती घेतली. अग्निशमन यंत्रणेने पाहणी करून सर्वे करण्याच्या सूचना दिल्या. महाराष्‍ट्र आग प्रतिबंधक व जिवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 च्‍या आधीन राहून उपाय-योजनाबाबत नोटीसा दयाव्यात आणि नोटीस दिल्‍यानंतर सात दिवसांच्या आत उपाय योजना करून अग्निशमन विभागाचे रितसर नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करावेत अन्‍यथा कायदेशीर कायर्वाही करण्यात येईल अशा सूचना केल्या. यावेळी अग्निशमन यंत्रणा वतीने अशा घटना घडू नये याकरिता काय काय केले पाहिजे या विषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले. सध्या प्रचंड उष्णता असल्याने आग लागण्याचे प्रमाणही वाढत आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, अशा घटना घडल्यास त्वरित अग्निशमन यंत्रणा विभागास सूचना करावी असे सांगितले. या बैठकीस शहरातील सर्व संचालक, कोचिंग क्‍लासेस, अभ्‍यासिका, मुलाचे-मुलिंचे वसतीगृहे (शासकिय-खाजगी) सह मनपा अधिकारी उपस्थित होते.