1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुण्यात प्रेयसीला सॉरी म्हणण्यासाठी 300 बॅनर

pune news
प्रेमात रुसवा- फुगवा असतोच पण प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी भर रस्त्यात 300 बॅनर लावण्याचा प्रकार पिंपरीतील सौदागर येथे बघायला मिळाला आहे. या बॅनरर्स चांगलीच चर्चा रंगली आहे ज्यावर एका प्रियकरानं ‘Shivde I Am Sorry’ असे 300 बॅनर झळकवले आहेत.
 
इतक्या मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी होत असल्यामुळे पोलिसांनी याची दखल घेतली व तपास केल्यावर कळून आले की त्या प्रियकराची रुसलेली प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने हा प्रताप केला गेला आहे. निलेश खेडेकर असे प्रियकराचे नाव असून त्याने मित्र आदित्य शिंदेला हे बॅनर लावायला सांगितले होते.
  
पण हे भळतं प्रेम गळ्याशी येऊ शकतं कारण विनापरवाना बॅनर लावल्याप्रकरणी निलेश खेडेकरवर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून दंड वसूल केला जाण्याची शक्यता आहे. त्याला माफी मिळाली का नाही हे तर माहित नाही परंतू दंड मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.