सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (17:32 IST)

संतापजनक, भुताची भीती दाखवत मुलीवर बलात्कार

तुमचा संताप होणार आहे. हा प्रकार पिंपरी चिंचवड येथे घडला आहे. पिंपरीमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाला आहे.हा सर्व प्रकार नागसेन परिसरात घडला आहे. भुताची भीती दाखवत  चिमुकलीला अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयात  पीडित मुलीला दाखल केले आहे. या प्रकरणी एका तडीपार गुंडास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून, घटनेमुळे परिसरात संताप आणि खळबळ उडाली आहे. शहरात लैंगिग अत्याचाराच्या घडणाऱ्या घटनांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगोदर दोन मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर परिसरात खेळत असणाऱ्या एका चार वर्षीय मुलीला भुताची भीती दाखवली गेली.नंतर तिला निर्जनस्थळी नेऊन नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहे. घरासमोर असलेल्या अंगणात खेळणाऱ्या मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे कुटुंबीय धावपळ केली. काही वेळानंतर मुलगी स्वतःहून घरी आली. तिच्या अंगावरील जखमा पाहून पालकांनी तिला याबाबत विचारपूस केली असता, तिने 'भागूचा काका' असे म्हणत घडलेला प्रकार सांगितला आहे. तिला तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी ससून येथे नेले आहे. मुलीने केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी एका तडीपार गुंडास ताब्यात घेतले आहे. नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.