गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (16:05 IST)

आदित्य ठाकरे विरोधात उमेदवारी मागे घ्या, दोन कोटींची ऑफर

युवा सेना प्रमुख व ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या वंचित बहुकजण आघाडीच्या उमेदवार गौतम गायकवाड यांना माघार घेण्यासाठी २ कोटींची ऑफर मिळाली आहे. 
 
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे नाव सांगत ठाण्यातील एका व्यक्तीने कॉल करून ही ऑफर दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला असून, गायकवाड यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार देखील  दाखल केली. कॉलनंतर त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीसही त्यांच्यासोबत दिला आहे. गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्यांना शिवसेनेकडून फोन येते होते. 
 
गुरुवारी आनंद दिघे यांच्या विश्वासू आणि जवळच्या कार्यकर्त्यानी त्यांची दादर परिसरात भेट देखील घेतली होती. सोबतच त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी २ कोटींची ऑफर दिली होती. सोबतच ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासमोर उभ्या असलेल्या वंचित उमेदवारालाही 25 लाख देणार असल्याचे त्याने सांगितले, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांनी अप्पर पोलीस आयुक्ताकड़े लेखी तक्रार दिली आहे. या कॉलमागे नेमके कोण आहेत याचा शोध घेण्याची विनंती गायकवाड यांनी पोलिसांकडे केली असून, त्यानुसार वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत. यामागे एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून हे कॉल येत असल्याचा संशयही गायकवाड़ यांनी वर्तवला आहे. त्यामुळे वरळी येथील राजकीय वातावरण तापले आहे.