सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (15:58 IST)

अजित दादा तुम्ही कोठे नाचता सांगायला भाग पाडू नका

राष्ट्रवादीचे नेते अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला भाग पाडू नका, असं म्हणत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत त्यांना उत्तर दिले आहे. अजित पवारांनी ढोबळे यांचा ‘नाच्या’ उल्लेखाला हे उत्तर दिले आहे.
 
ढोबळे म्हणाले की ‘अजितदादा मी तर माझ्याच पक्षाचा झेंडा घेऊन नाचलो, मात्र तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला लावू नका’ अशा शब्दात पवारांनवर टीका केली आहे. ढोबळे पुढे म्हणतात की. ‘अजित पवार हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या वक्तव्यातून त्यांचे संस्कार दिसतात’ 
 
धरणाचं पाणी ते खारट करतात, हे सर्वाना माहित होतं. तर जनमानसात चार गोष्टी बोलून माणसं दुखावणं, हा त्यांचा जुना छंद असून, या बोलण्यामुळे  पक्षाचं वाटोळं झालं आहे. तर शरद पवारांचं सुद्धा वाटोळं झालं, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष उद्ध्वस्त झाला आहे. मात्र तरींही अजित पवारांमध्ये सुधारणा झालेली दिसत नाही, असंही ढोबळे म्हणाले.
 
अशा नेत्यांवर हात उगारण्यापेक्षा मतं उगारण्याची वेळ आता आली असून, तेव्हाच यांना आपली जागा समजेल. संपत्तीचं गुरगुरणं, वाचाळपणा थांबलेला नाही. अजित पवारांना अश्रू अनावर झाले, तेव्हा पश्चाताप झाला असेल, असं मला वाटलं. मात्र  वर्तनात सुधारणा करण्याऐवजी धरणाचं पाणी खारट करणं थांबलं नाही, असा टोलाही लक्ष्मण ढोबळे यांनी  लगावला आहे. दोघा नेत्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे.