testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भोलेनाथाची महाशिवरात्र

शिवशंकर
वेबदुनिया|
PR
PR
'महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गून महिन्याच्या कृष्‍ण त्रयोदशीला हे पर्व असते. महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतुचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे.

'शिव' म्हणजे कल्याण. म्हणून भेदभाव न करता भाविकांवर चटकन प्रसन्न होतो. त्यांच्या जीवनातील दु:ख दूर करतो.

गौरी अर्थात पार्वतीच्या या पतीचे वास्तव्य नेहमी स्मशानात असते. स्मशानातील प्रेताची राख ते सर्वांगाला भस्म म्हणून लावतात. गळ्यामध्ये सर्पहार असतो. विष पिऊन कंठ निळा झाल्याने त्याला 'नीलकंठ' म्हणूनही संबो‍धले जाते.
महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्‍याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात.

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या द‍िनी व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.
महाशिवरात्रीचे व्रत कुमारीका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो.

शिवरात्री वर्षभरात प्रत्येक महिन्यात येत असते. मास महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

धनत्रयोदशीची कहाणी

धनत्रयोदशीची कहाणी
एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी ...

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या
पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे म्हणून या दिवशी शनी व्रत आणि पूजन केलं जातं.

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?
पुष्य नट्रक्षात लोक बर्‍याचदा सोनं किंवा चांदी विकत घेतात, पण लोखंड खरेदी करायचा की नाही ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय खरेदी करावी
ज्योतिष्यांप्रमाणे यंदा पुष्‍य नक्षत्र दोन दिवस असेल. 21 ऑक्टोबर रोजी सोम पुष्य आणि 22 ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा वाचून घ्या
काचेचं तुटलेलं सामान घरातील कोणत्याही कोपर्‍यात तुटलेलं काचेचं सामान किंवा खिडकीत तुटका ...

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...