गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (18:49 IST)

महाशिवरात्री 10 ज्योतिषीय उपाय, धन पैसा संपत्ती मिळेल अपार

महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री ब्रह्माजींच्या अंगातून भगवान शिव लिंगा या रूपात प्रकट झाले. या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा करून पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भोलेनाथाचा विवाह माता पार्वती यांच्याशी झाला होता, असे मानले जाते.
 
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रसन्न करण्यासाठी 10 खास ज्योतिष उपाय केल्यास व्यक्तीला अपार धन प्राप्त होते.
 
1. महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य ब्राह्मणाचा सल्ला घेऊन घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करा, त्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते.
 
2. शिवरात्रीला 21 बिल्वच्या पानांवर चंदनाने 'ॐ नम: शिवाय' लिहून शिवलिंगावर अर्पण करा. याने इच्छा पूर्ण होतात.
 
3. एका भांड्यात काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ''ॐ नम: शिवाय' मंत्राचा जप करावा. याने मनाला शांती लाभेल आणि पितर प्रसन्न होऊन अपार संपत्ती प्राप्त होईल.
 
4. महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलाने शिवाची पूजा करा, या उपायाने घरातून गरीबी दूर होते.
 
5. शिवरात्रीला कणेरच्या फुलांनी भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने इच्छित धन प्राप्तीचे वरदान मिळते.
 
6. या दिवशी पिठाचे गोळे माशांना खायला द्या. या दरम्यान भगवान शिवाचे ध्यान करत राहा. यामुळे संपत्ती मिळते.
 
7. शिवरात्रीला गरीब, असहाय्य व्यक्तींना अन्नदान करा. यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल.
 
8. भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांच्या पैशासंबंधी समस्याही दूर होतात. नियमित शिव पूजा केल्याने अमाप संपत्ती मिळते.
 
9. शमीच्या झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने अपार संपत्तीचा आशीर्वाद मिळतो.
 
10. महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अपार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होतं.