सोमवार, 5 डिसेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified मंगळवार, 1 मार्च 2022 (09:59 IST)

जय शिव शंकर, साम्भ सदाशीव

जय शिव शंकर, साम्भ सदाशीव,
महारुद्र ओंकारा,
आज असे महाशिवरात्री, तुझाच जय जयकारा,
जोतिर्लिंगा चे घ्यावे दर्शन, मनोकामना सगळ्यांची,
तूच जळी स्थळी वसतो, काळजी तुज सर्वांची,
भोळी भक्ती तुज आवडे, पावीशी तूच सकळा,
हलाहल प्राशुनी झाला तुझा कंठ निळा,
पार्वती ने केले कठोर तप, प्राप्त केले तुजला,
कैलासा वर तुझा वास, येतो प्रत्यय मनुष्याला,
प्रार्थना तुजला हे कैलाश राणा, करी मनोरथ पूर्ण,
सेवेत च खर्च व्हावे उर्वरीत काळ, तूच परब्रम्ह सम्पूर्ण!
...अश्विनी थत्ते