गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Updated : शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (17:21 IST)

महाशिवरात्री 2023 शुभेच्छा Mahashivratri 2023 Wishes Marathi

कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत
शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत
शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत
महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
महादेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा
 
भगवान शंकराची महिमा अपरंपार
शिव करतात सर्वांचा उद्धार
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला
उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
न जगण्याचा आनंद
न मरणाचे दुःख
फक्त जोपर्यंत आहे जीव
तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना
शिवमय शुभेच्छा
जय भोलेनाथ ।
 
महादेवामुळे संसार
महादेवामुळेच शक्ती
स्वर्ग सुख आणि आनंद ज्यांच्यामुळे
अशा महादेवाची करा सतत भक्ती
हर हर महादेव
 
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात
आणि
जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
शिव सत्य आहे,
शिव अनंत आहे,
शिव अनादी आहे,
शिव भगवंत आहे,
शिव ओंकार आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव भक्ती आहे,
शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
 
काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव
 
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
 
मृत्यूचे नाव काल आहे
अमर फक्त महाकाल आहे
मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत
चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत
हर हर महादेव
 
हर हर महादेवचा होऊ दे गजर…
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा