शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. महाशिवरात्री
Written By वेबदुनिया|

श्रीत्र्यंबकेश्वराची आरती

WD
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो । त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशीशेखरा हो ।
वृषभारूढ फणिभूषण दशभुज पंचानना हो। विभूति माळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥धृ.॥
पडलें गोहत्येचें पातक गौतमॠषिच्या शिरींहो । त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरी हो ।
प्रसन्न हौनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो । औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय.॥१॥
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं कितीहो। आणिकही बहु तीर्थें गंगाव्दारादिक पर्वती हो ।
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो । तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥जय.॥२॥
ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो । तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणी रुपती खडे हो ।
तंव तंव पुण्यविशेषें किल्मिष अवघें त्यांचे झडे हो । केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय.॥३॥
लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो । संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ।
शिवशिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो । गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥जय.॥४॥