मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By वेबदुनिया|

कस्तूरबांचे प्रेरणास्थान- बापू

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे एक तत्त्व होते, ते जे काही सांगत ते आधी स्वत: कृतीत आणत. त्यांच्या संदर्भातील असे अनेक प्रसंग आजही प्रेरक ठरत आहेत. गांधीजींची पत्‍नी कस्तुरबा यांच्यासाठी तर ते प्रेरणास्थानच होते. 

कस्तुरबा नेहमी आजारी राहत. एके दिवशी गांधीजींनी त्यांना एक सल्ला दिला, की 'तुम्ही मीठ खाणे सोडून दिले पाहिजे. तुम्ही लवकर बर्‍या व्हाल.' यावर कस्तुरबाजींनी उत्तर दिले, 'मीठा विना अन्नाला काय चव राहणार?'

गांधीजी बोलले 'मीठ आधी सोडून तर बघा!' कस्तूरबाजी त्यावर म्हणाल्या, 'तुम्ही मीठाचा त्याग करू शकता?' गांधीजींनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता 'हे घ्या केला मीठाचा त्याग !' असा त्यांच्यासमोर संकल्प केला. तेव्हापासून मीठ काय असते, हे त्यांना माहीत नव्हते. गांधीजी आधी कृती करायचे आणि त्यानंतर समोरच्याला सांगायचे. त्यांच्यासाठी ते स्वत:च प्रेरक होते.

सांगण्याचे तात्पर्य हेच की, व्यक्तीला आज जे काही आजार आहेत ते मीठाचे कमी-जास्त प्रमाणात सेवन केल्याने होतात. डॉक्टरांनीही हे मान्य केले आहे. डॉक्टर तर सांगतात की, जेवणात मीठाचा वापर चवीपुरताच केला पाहिजे. जेवणात वरून मीठ घेण्याची काही आवश्यकता नाही. ते आरोग्यास हानीकारक आहे. फळे व हिरव्या पालेभाज्यांमध्येही क्षार असतात. त्यांच्या माध्यमातून आपल्या शरीराला पाहिजे त्या प्रमाणात मीठ मिळत असते. त्याचप्रमाणे कोणी साखर व त्यापासून तयार झालेल्या पदार्थांचे अतिसेवन करतात. त्यामुळेही ते अनेक आजारांनी त्रस्त असतात. अधिक चहा व मादक द्रव्यांचे सेवन करून आपणच स्वत: आजाराला आमंत्रित करून 'आ बैल मुझे मार' ही म्हण सत्य करून दाखवतो.