1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: रविवार, 15 जानेवारी 2023 (09:59 IST)

Makar Sankranti: दानाचे महत्व

makar sankrant vahan
सुर्यदेवाचे संक्रमण प्रत्येक राशीतून होतंच असते,
पण मकर राशीतून ते होणार, याचं महत्व असते,
दानाचे महत्व याच मासात आहे सांगितले,
तिळगुळाचे सेवन ही हितकारक आहे मानले,
द्यावा तिळगुळ, गोडी अन स्नेह वाढवतो नात्यातला,
सुवासिनींना वाण देऊन, घ्यावा वाटा पुण्यातला,
नविनवरी काळी साडी  याच दिशी नेसते,
सुंदर नाजूक हलव्याचे दागिने त्यावर लेते,
आकाशात रंगबिरंगी पतंगा, आनंदात डोलतात,
ओ ss काट च्या आरोळ्या कानी ऐकू येतात,
लगबगीने आया बाया एकदुसरी च्या घरी जातात,
आनंदाने सर्वचजण संक्रांतिचा सण साजरा करतात.
...अश्विनी थत्ते