1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. मकरसंक्रांत

तिळाचा गोड भात

तिळाचा गोड भात
साहित्य - चांगल्या प्रतीचा तांदूळ दोन वाटी, साखर दीड वाटी, पांढरे तीळ एक वाटी, खवलेला नारळ एक वाटी, जायफळ-वेलची पूड, काजूचे काप-बेदाणे, दोन टे. स्पू. तूप, दोन लवंगा, दोन मिरी, चार वाटी पाणी.

कृती - तांदूळ धुवून घ्या. पातेल्यात तूप टाकून त्यात लवंगा-मिरी टाकून तांदूळ टाकून परतवा. पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. परातीत थंड करण्यास ठेवा. तीळ भाजून जाडसर कुटून घ्या. भात-तिळाचा कूट-खोवलेला नारळ-साखर-जायफळ-वेलची पूड एकत्र करून घ्या. एका जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप टाकून मिश्रण पसरवा. त्यावर काजूचे काप व बेदाणे पसरवून मंद गॅसवर ठेवून भात वाफवून घ्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा