गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (23:29 IST)

छगन भुजबळांचा मराठा आरक्षणावरून फडणवीसांना घरचा अहेर, ते म्हणतात...

chagan bhujbal
मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाना कधीही विरोध केला नाही. पण आम्ही म्हणालो आहोत की मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावता कामा नये, असं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. ओबीसीत 375 जाती आहेत.जर ओबीसी आरक्षणात मराठा समाज आला तर याचा कुणालाही फायदा होणार नाही. हीच सर्वपक्षीय भूमिका असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
 
छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली
 
छगन भुजबळ पुढे म्हणाले की "मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे, कायद्याच्या विरोधात आहे. यामुळे ओबीसींचं आरक्षण संपणार आहे."
 
सरकार मराठ्यांना घाबरले का? जणगणना झाल्यास ओबीसींचं प्रमाण किती यांचं उत्तर मिळेल.
जनगणना झाल्यास ओबीसींचं प्रमाण किती आहे याचं उत्तर मिळेल, असं ही भुजबळ म्हणाले.
 
भुजबळ पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की ,आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, या विरोधात आवाज उठवायला कुणी तयार होत नाही
 
लोक एवढे घाबरले आहेत. मतांसाठी सगळं घडत असेल तर तुम्हाला ओबीसींची मते नकोय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
मी 375 जातींचे प्रतिनिधित्व करत आहे. कोणत्याही एका जातीचं नाही. लेकर बाळ फक्त मराठ्यांची नाहीत तर सगळ्यांचीच आहेत.ओबीसी समाजाने सरकार आणि जनतेसमोर आपला रोष व्यक्त केला पाहिजे असं भुजबळ म्हणाले.
ओबीसी नेत्यांच्या घरांवर झालेल्या हल्याचा मुद्दाही भुजबळ यांनी उपस्थित केला.सभेमुळे नुकसान झालं त्यांना भरपाई दिली गेली. पण जाळपोळ आणि घरांचं नुकसान झालं त्यांना भरपाई घ्यायला हवी, असं भुजबळ म्हणाले.
 
गावकऱ्यांनी दगडफेक केली याचे पुरावे काय आहेत असा प्रश्न भुजबळ यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की याबाबत गृहमंत्र्यांना विचारा.
 
पण ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
 
भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या भेटीला राज्याचे दोन माजी न्यायमूर्ती पाठवणे हा चुकीचा निर्णय होता.
 
छगन भुजबळ यांच्या विधानानंतर मनोज जरांगे यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली. ते भुजबळांबाबत म्हणाले की, त्यांचं एकूण बोलणं बघितलं तर वातावरण दुषित करण्यासारखं आहे पण मराठे ते दूषित होऊ देणार नाही. गावागावातल्या ओबीसी बांधवांना मराठा बांधव भेटतील आम्ही आमच्यात एकोपा ठेवू. ते काय स्वप्न पाहून जगत आहेत माहिती नाही. मात्र शेवटी त्यांच्या जे पोटात होतं ते ओठावर आलंच. ते करेंगे या मरेंगे असं म्हणालेत. पण मराठ्यांचं आंदोलन शांततेच होईल.
 
मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय की या प्रकरणाची जाहीर चौकशी करा. अशी चौकशी करा की हा कट कोणी घडवून आणला. तसंच दबाव कोणी आणला हे त्यांचं त्यांना माहिती.
 
न्यायमूर्ती पाठवयला नको होते असं छगन भुजबळ म्हणाताहेत असा प्रश्न जरांगे यांना करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, "त्यांच्या खांद्यावर बसून ऐशोआराम करायला लागलेत आणि त्यांच्यावरच टीका करताहेत."
 
तर "छगन भुजबळांनी काय आरोप केलेत त्याबद्दल मी काही बोलणार नाही. माझ्या मुख्यमंत्र्याने जी शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षणाचं वचन दिलंय आम्ही त्यांच्याबरोबर आहोत" अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी दिली आहे.
 




Published By- Priya Dixit