रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (15:59 IST)

Alandi : मराठा आरक्षणासाठी 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

suicide
सध्या राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटीलांनी आंदोलन केले आहे.आरक्षणाचा मुद्दा पेटला असून तरुण मराठा आरक्षण मिळण्यासाठी आत्महत्या करत आहे. राज्यात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यात 28  जणांनी मृत्यूला कवटाळले आहे. 

मराठा आरक्षणासाठी आळंदी जवळ चिंबळीच्या एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. सिद्धेश सत्यवान बर्गे असे या मयत तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी हा तरुण आपला जीव देत असल्याचे याने एका चिट्ठीत नमूद केलं आहे.  

मी अजून कोणाला नाही तर शासकीय कार्यपद्धतीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिट्ठीत नमूद केलं आहे. मराठी समाजाला आरक्षण मिळावे अशी मी इच्छा करतो. आपल्या सर्व मराठा बांधवाला आरक्षण मिळण्यासाठी मी हे पाऊल घेत आहे. 

मराठा आरक्षणासाठी तरुणांनी असे टोकाचे पाऊल घेऊ नये असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंदोलनकर्त्ये   मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit