शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (16:19 IST)

EWS आरक्षणाचा मराठा आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही

EWS आरक्षणाचा मराठा आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली आहे. EWS आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला केलेला असतानाच त्यावर सरकारकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे. 
 
प्रसारमाध्यमांशाी संवाद साधताना अनिल परब यांनी मराठा आरक्षणावरील सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा संघटनात वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत. या संघटनांनी एकत्र येवून निर्णय द्यायला हवा. EWS च्या मागणीसाठी काही विद्यार्थी कोर्टात जातायत व त्यांना ते द्यावं लागतंय. हा काही एका जातीपुरता निर्णय नाही, तर गरीब घटकांसाठीचा निर्णय आहे. याचा मराठा आरक्षणावर फरक पड़त नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.