शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (16:06 IST)

उशीर झाला तरी चालेल, पण मराठा आरक्षण टिकलं पाहिजे : अशोक चव्हाण

उशीर झाला तरी चालेल, पण मराठा आरक्षण टिकलं पाहिजे, ही आमची भूमिका असल्याचं काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.इंदिरा सहानीचं प्रकरणी 9 न्यायाधीशांच्या बेंचने घेतलं होतं. त्यामुळे, या निर्णयाला ओव्हररुल करायचं असले, तर सध्याच्या 5 मेंबर्सच्या न्यायाधीश बेचंसमोर हा विषय सुटणार नाही. त्यामुळे, आम्ही लार्जर दॅन म्हणजे जास्त न्यायाधीशांच्या बेंचपुढे हा खटला मांडण्यात यावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटंलय. 
 
सुनावणी लांबणीवर पडली तरी काही फरक पडत नाही, पण कायदेशीर युक्तीवाद व्यवस्थीतपणे व्हावेत. त्यामुळे 9 शेड्युलमध्ये ही सुनावणी गेल्यास मराठा आरक्षणाला संरक्षण मिळेल. पंतप्रधानांनी खासदारांना भेट द्यावी असंही शिक्कामोर्तब केलंय. उद्या खासदारांची बैठक आहे, तिथेही हा विषय आम्ही घेणार आहोत. आता, सुनावणी 5 फ्रेबुवारीपर्यंत लांबलीय. त्यामुळे, वेळ असल्याने खासदारांनी पंतप्रधानांना भेटलं पाहिजे, तसेच अॅटर्नी जनरल यांनी सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न झाले पाहिजेत, असेही ते म्हणाले.