रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (09:40 IST)

आता दिल्लीत धडकणार मराठा समाजाचा मोर्चा!

राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत असताना आता हा मूक मोर्चा 20 नोव्हेंबरला दिल्लीत धडकणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा आयोजन समितीने दिली. 
 
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशक्ष देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानंतर मराठा समाजाचा हा मोर्चा 20 नोव्हेंबरला जंतरमंतर ते महाराष्ट्र सदनापर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चादरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मोर्चेकरी घेणार आहेत. या मोर्चामध्ये 40 ते 50 हजार मोर्चेकरी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगीही दिली असल्याची  माहिती मिळत आहे.